spot_img

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भटक्या समाजाचे प्रश्न लावले

भटके विमुक्ताना राज्यात कोठेही मिळणार रेशनिंग

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करावे. तसेच या समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग दुकानातून धान्य उपलब्ध होईल अशाप्रकारे १५ मागण्यांबाबतचे निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले.

भटके विमुक्त समाजातील विविध प्रश्नांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बैठकीला भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे यांच्यासह राज्यातील भटके विमुक्त समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भटक्या समाजातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन १५ प्रश्न तातडीने मार्गी लावले आहेत. गतवर्षी भटक्या समाजाच्या तांड्यावर दिवाळी साजरी केली होती. त्यांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावला. त्यामुळे राज्यभरात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गायरान जमीनीवर भटके समाजाची वस्ती आहे. याबाबत पंधरा दिवसात आराखडा सादर करावा. त्यांचाही प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल.

भटक्या समाजासाठी घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे :

 • जात प्रमाणपत्र गृहभेटी आधारावर देण्यात येणार.

• शाळा, महाविद्यालयात मंडणगड पॅटर्नप्रमाणे जात दाखले द्यावेत.

• १९६१ पूर्वीचे जात कागदपत्र नसणाऱ्यांना गृहचौकशी आधारे जात प्रमाणपत्र द्यावे.

• भटकंती करणाऱ्या व्यक्तींना नायब तहसिलदारामार्फत ओळखपत्र द्यावे.

• विविध दाखले देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात यावे.

• १९५२ चा सवयीचा गुन्हेगार कायदा रद्द करण्याबाबत प्रस्ताव द्यावा.

• आधारकार्डसाठी कागदपत्रांचा पर्याय देण्यात यावा.

• तात्पुरते रेशनकार्ड देण्याऐवजी कायमस्वरुपी देण्यात यावे.

• सरकारी किंवा खासगी जमीनीवर वसलेल्या भटके समाजाचे सर्वेक्षण करावे.

• भटक्या समाजाला रेशनकार्ड देण्यात यावे.

• भटक्या समाजाचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार.

• जागा वाटपासाठी वस्तीनिहाय यादी सादर करावी.

• अन्याय अत्याचार प्रतिबंधक व संरक्षण समितीची स्थापना करुन तिची बैठक घेणार.

• भटके विमुक्तांना कसण्यासाठी पट्टे उपलब्ध करुन देणार.

Related Articles

पशुधनासाठी चारा लागवडीला शासनाचे प्रोत्साहन; सात नवीन चारा पिकांचा योजनेत समावेश!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत वैयक्तिक तसेच...

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आधार व स्वयंम योजनांचे नूतनीकरण सुरू!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यातील ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ आणि ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ यांचा लाभ घेणाऱ्या विद्यमान विद्यार्थ्यांनी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!