spot_img
spot_img

डॉ. सारिका यांना गटनेतेपद तर डॉ.योगेश क्षीरसागर यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

झुंजार सेनापती l बीड

बीड नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी डॉ. सारिका योगेश क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक १५ मधून तब्बल ७९६ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला होता. त्यांच्या या निवडीमुळे नगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
निवडणुकीनंतर “बीड क्षीरसागर मुक्त झाले” अशा चर्चांवर प्रत्युत्तर देताना डॉ. क्षीरसागर यांनी, “बीड क्षीरसागर मुक्त कसे होईल, मी आहे ना!” असे ठामपणे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली होती. भाजपचे १५ नगरसेवक आणि त्यांचे दीर संदीप क्षीरसागर यांचे नगरसेवक मिळून क्षीरसागर कुटुंबाचे पालिकेतील वर्चस्व कायम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सध्या बीड नगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भाजप महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जरी नगराध्यक्ष पद अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे असले, तरी उपनगराध्यक्ष पद आणि सत्तेच्या समीकरणांमध्ये भाजप निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, डॉ. सारिका क्षीरसागर यांचे पती डॉ. योगेश क्षीरसागर यांची भाजपकडून माजलगाव, वडवणी आणि धारूर तालुक्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Related Articles

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान

⬤ झुंजार सेनापती l मुंबई : पर्यावरण वाचवणे आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे....

“कार्यालयाला कुलूप, कर्मचारी बेपत्ता! बीड पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर”

⬤ झुंजार सेनापती l मुंबई शासकीय कार्यालयांमधील अनागोंदी कारभार आणि जनतेच्या कामांबाबतची उदासीनता पुन्हा एकदा उघड झाली आहे. दैनिक झुंजार सेनापतीचे संपादक सोमनाथ पाटील यांनी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!