spot_img
spot_img
spot_img

आंतरराष्ट्रीय फसवणूक प्रकरणात अदानींना समन्स देण्यास भारताचा नकार!

अमेरिकेच्या SECची मागणी भारताने फेटाळली

झुंजार सेनापती l नवी दिल्ली
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील फसवणूक प्रकरणात अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनला (SEC) मोठा धक्का बसला आहे. अदानींना समन्स बजावण्यासाठी केलेली मागणी भारत सरकारने दोन वेळा ठामपणे नाकारली आहे. त्यामुळे आता भारताला बायपास करून थेट समन्स देण्याची परवानगी मिळवण्यासाठी एसईसीने अमेरिकन न्यायालयात धाव घेतली आहे.
एसईसीकडून कथित आर्थिक फसवणूक आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणात समन्स देण्यासाठी भारत सरकारच्या सहकार्याची आवश्यकता होती. मात्र तांत्रिक व प्रक्रियात्मक कारणे पुढे करत भारताने ही परवानगी नाकारल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या घडामोडींमुळे अदानी समूहाच्या शेअर्सवर परिणाम झाला असून बाजारात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळून लावत हे प्रकरण निराधार असल्याचा दावा केला आहे. मात्र भारताचा नकार आणि अमेरिकेची आक्रमक भूमिका यामुळे हे प्रकरण आता जागतिक वादाचे केंद्र बनले आहे.

Related Articles

चीनच्या घुसखोरीवरून लोकसभेत गदारोळ; काँग्रेसचे ८ खासदार निलंबित

झुंजार सेनापती l नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी)  चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून लोकसभेत आज सलग दुसऱ्या दिवशी तीव्र गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्यापासून...

बारामती अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय; व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष ऑडिट

झुंजार सेनापती l मुंबई  बारामतीतील विमान अपघाताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गंभीर दखल घेत ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या विमान कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!