spot_img
spot_img
spot_img

बारामती अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय; व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष ऑडिट

झुंजार सेनापती l मुंबई 

बारामतीतील विमान अपघाताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) गंभीर दखल घेत ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या विमान कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. ऑडिट पूर्ण करून सविस्तर अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत असलेले ‘लिअरजेट ४५ एक्सआर’ हे विमान अपघातग्रस्त झाल्यानंतर डीजीसीएने चौकशीसाठी विशेष पथक नेमले आहे. कंपनीचे दैनंदिन कामकाज, वैमानिकांचे लॉगबुक्स तसेच विमानांच्या देखभालीची नोंदवही यांची सखोल तपासणी या पथकाकडून केली जाणार आहे.
दरम्यान, व्हीएसआर व्हेंचर्सची विमाने यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. कंपनीच्या व्हीटी-डीबीएल या विमानाचा सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत अपघात झाला होता. त्यानंतर युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने (EASA) कंपनीकडून माहिती मागवली होती. समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने ईएएसएने कंपनीच्या विमानांना आपल्या हद्दीत प्रवेशबंदी लागू केली होती.

Related Articles

चीनच्या घुसखोरीवरून लोकसभेत गदारोळ; काँग्रेसचे ८ खासदार निलंबित

झुंजार सेनापती l नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी)  चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून लोकसभेत आज सलग दुसऱ्या दिवशी तीव्र गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्यापासून...

टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

झुंजार सेनापती l मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी)  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कामातून...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!