spot_img
spot_img

मुंबईच्या उद्योगांसाठी निर्यातीची दारे उघडणारे इग्नाईट–२०२६

ओडीओपी, निर्यात हब आणि क्लस्टर विकासावर भर

झुंजार सेनापती l मुंबई

राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राची कार्यक्षमता व उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने Industry and Government Networking for Inclusive Transformation and Empowerment (IGNITE–2026) या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

ही कार्यशाळा विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई शहर अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली. 3 फेब्रुवारी 2026 रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे झाली.

कार्यशाळेला उद्योग सह संचालक श्रीमती विजू सिरसाठ, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री, एसईपीसीचे प्रतिनिधी विवेक बक्षी, एफआयईओ च्या श्रीमती रिषु मिश्रा, IDBI Capital चे विक्रम जैन, सीप्झ संस्थेच्या श्रीमती शामली बॅनर्जी यांच्यासह विविध क्षेत्रांतील 180 प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी उद्योग सह संचालक विजू सिरसाठ यांनी मुंबईतील उद्योजकीय वातावरण वृद्धिंगत करण्यासाठी इग्नाईट कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली. निर्यात धोरण, डिस्ट्रिक्ट अ‍ॅज एक्स्पोर्ट हब, नवीन औद्योगिक धोरण तसेच उद्योग विभागाच्या विविध पुढाकारांची माहिती उपस्थित उद्योजकांना देण्यात आली. एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) उपक्रमांतर्गत मुंबई उपनगरासाठी जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी तर मुंबई शहरासाठी लेदर उत्पादनांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्हा निर्यातीत आघाडीवर असून, ‘सेव्हन पॉइंट्स अजेंडा’ राबवून पुढील वर्षी निर्यातीमध्ये डबल डिजिट वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. याअंतर्गत प्रस्तावित लेदर पार्क व जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी क्लस्टरबाबत माहिती देण्यात आली. तसेच उद्योग सह संचालक कार्यालय, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्यात ओडीओपी ब्रँडिंग व प्रमोशनसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारातून जागरूकता कार्यक्रम, उद्योग भेटी, संशोधन व ‘एक तालुका दहा निर्यातदार’ उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

कार्यशाळेत निर्यात धोरणावर श्रीमती पूनम दराडे यांनी सादरीकरण केले. एसईपीसी चे विवेक बक्षी यांनी सेवा क्षेत्रातील निर्यात संधी, एफआयईओ च्या श्रीमती रिषु मिश्रा यांनी ओडीओपी निर्यात ट्रेंड्स, तर लेदर उद्योगातील उद्योजक सचिन शिंदे यांनी उत्पादन, रोजगार व निर्यात संधींबाबत अनुभव कथन केला. ‘आयडीबीआय’ कॅपिटलचे विक्रम जैन यांनी भांडवली मदतीविषयी मार्गदर्शन केले, तर MAITRI पोर्टलची माहिती मनीषा कुंभार यांनी दिली.

कार्यशाळेस शुभेच्छा देताना अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी मुंबई शहराच्या विकासात निर्यात व एमएसएमई  क्षेत्राचे महत्व अधोरेखित करत उद्योजकांनी उद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थितांचे आभार उद्योग अधिकारी विलास कुमटकर यांनी मानले.

Related Articles

Tutto quello che devi sapere sul bonus Newgioco per i nuovi giocatori

In questo articolo, esploreremo nel dettaglio il bonus newgioco offerto ai nuovi giocatori. Discuteremo delle diverse tipologie di bonus disponibili, dei requisiti di scommessa,...

Kā x3000 lv piedāvājumi var uzlabot jūsu azartspēļu pieredzi

Šajā rakstā mēs aplūkosim, kā x3000 lv piedāvājumi var būtiski uzlabot jūsu azartspēļu pieredzi. Mēs izpētīsim dažādas bonusu iespējas, bezriska griezienus, un citas priekšrocības,...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!