spot_img
spot_img
spot_img

म्हाडा मुख्यालयात उंदरांचे साम्राज्य; कर्मचारी त्रस्त

झुंजार सेनापती l मुंबई : वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या गृहनिर्माण भवन मुख्यालयात उंदरांचा प्रचंड उच्छाद वाढला असून कर्मचारी हैराण झाले आहेत. इमारतीतील महत्त्वाच्या फाइल्स व कागदपत्रांची उंदरांकडून नासधूस होण्याची भीती व्यक्त होत आहे. उंदरांनी विजेच्या तारा कुरतडल्याच्या घटनांमुळे सुरक्षेची चिंताही वाढली आहे.

गृहनिर्माण भवनमध्ये मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, तसेच मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाची कार्यालये आहेत. या इमारतीत सकाळच्या वेळी उंदरांच्या विष्ठेमुळे दुर्गंधी पसरलेली असते, तर सायंकाळी गर्दी कमी होताच उंदरांचा मुक्त संचार दिसून येतो. उशिरापर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. फाइल्स सुरक्षित ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बसवलेले कॉम्पॅक्टरही उंदरांपासून सुरक्षित नसल्याची तक्रार आहे.
उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हाडाच्या पीपीडी विभागाने कार्यालयात ठिकठिकाणी सापळे लावले असून काही ठिकाणी सिलिंग बंद करण्यात आले आहे. आणखी सापळे आणि रॅट ग्लू पॅड खरेदीसाठी निविदा काढण्यात आली आहे.

Related Articles

मुंबई-पुणे महामार्गावर आपत्ती टँकर उलटला; प्रशासन हतबल

झुंजार सेनापती l मुंबई पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टँकर उलटल्याने मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली....

परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहन

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पीएचडी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्याच्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!