spot_img
spot_img

बलात्कारी ज्योतिषी बाबा अडचणीत; पोलिस छाप्यात ३०० कोटींचा ‘खजिना’ उघड

झुंजार सेनापती l मुंबई
महिलेवर बलात्कार केल्याच्या गंभीर आरोपात अटकेत असलेला राजकीय ज्योतिषी अशोककुमार खरात याच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत त्याचे घर, फार्महाऊस तसेच कार्यालयावर सखोल झडती घेतली. या कारवाईदरम्यान बाजारभावानुसार सुमारे ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.
याशिवाय झडतीदरम्यान एक पिस्तूल तसेच अन्य आक्षेपार्ह पुरावेही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील तपास अधिक गतीने सुरू असून, खरातविरोधात आणखी काही गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात मोठ्या आर्थिक व्यवहारांचा आणि मालमत्ता उभारणीचा संशय व्यक्त करण्यात येत असून, संबंधित कागदपत्रांची सखोल चौकशी सुरू आहे. त्यामुळे अशोककुमार खरात याच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

मोशीतील हिंदू संमेलनामुळे वाहतुकीत बदल

झुंजार सेनापती l पिंपरी-चिंचवड मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरात आज (रविवार) ‘विराट हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात...

महागाईची मोठी लाट येण्याचा गांधींचा इशारा

झुंजार सेनापती l मुंबई मुंबई, दि. २२ : इराण-इस्रायल युद्धामुळे देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले आहेत. पुरवठा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!