spot_img
spot_img

सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; तळेगावात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू,सोसायटीच्या ११ जणांवर गुन्हा

झुंजार सेनापती l प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे येथील ‘निसर्ग हौसिंग सोसायटी’मध्ये लिफ्टच्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून रहिवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश सुरंगे हे लिफ्टने खाली येत असताना तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान अडकली. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच अचानक लिफ्टची मुख्य केबल तुटली. काही क्षणांतच लिफ्ट वेगाने खाली कोसळली. या भीषण अपघातात दिनेश सुरंगे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी दिनेश यांचे बंधू रितेश रामा सुरंगे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक तपासात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून लिफ्टच्या देखभालीकडे निष्काळजीपणा झाल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी सोसायटीचे चेअरमन पुंडलिक वारके, दीपक हेंद्रे, विनायक खोराटे, नीलेश गवळी, प्रवीण श्रीवास यांच्यासह एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लिफ्टची तांत्रिक तपासणी आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Tutto quello che devi sapere sul bonus Newgioco per i nuovi giocatori

In questo articolo, esploreremo nel dettaglio il bonus newgioco offerto ai nuovi giocatori. Discuteremo delle diverse tipologie di bonus disponibili, dei requisiti di scommessa,...

Kā x3000 lv piedāvājumi var uzlabot jūsu azartspēļu pieredzi

Šajā rakstā mēs aplūkosim, kā x3000 lv piedāvājumi var būtiski uzlabot jūsu azartspēļu pieredzi. Mēs izpētīsim dažādas bonusu iespējas, bezriska griezienus, un citas priekšrocības,...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!