spot_img
spot_img

शिवपुतळ्यावरून अंजनगावात तणाव; मराठा-धनगर आमनेसामने

झुंजार सेनापती l प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून मराठा आणि धनगर समाजात तीव्र वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर दगडफेक, लाठीचार्ज आणि प्रशासकीय वाहनांच्या तोडफोडीत झाल्याने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजनगाव खेलोबा येथे रात्रीच्या वेळी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. मात्र हा पुतळा खेलोबा देवस्थानाच्या परिसरात परवानगीशिवाय उभारल्याचा आक्षेप धनगर समाजाने घेतला. यामुळे दोन्ही समाज आमनेसामने येत वाद चिघळला.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करत जमावबंदी लागू केली. तसेच दोन्ही समाजांमध्ये समन्वय साधण्यासाठी कोपरा सभा घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी धनगर समाजातील नागरिकांशी रस्त्यावर बसून चर्चा करत शांततेचे आवाहन केले.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला. यासाठी क्रेनही मागवण्यात आली होती. मात्र शिवप्रेमींनी यास तीव्र विरोध दर्शवला. याच वेळी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
या गोंधळात माढा तहसीलदारांच्या वाहनावरही जमावाने दगडफेक केली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले. काही युवक जखमी झाल्याची माहिती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गावात अद्याप तणाव कायम असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related Articles

Οδηγός για την πρώτη σας εγγραφή στο bizzo casino online

Αυτός ο οδηγός έχει σχεδιαστεί για να σας καθοδηγήσει στη διαδικασία της πρώτης σας εγγραφής στο bizzo casino online. Θα καλύψουμε όλα τα βήματα...

महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा वाचवण्यासाठी छत्रपती घराण्याने पुढाकार घ्यावा!

झुंजार सेनापती l मुंबई  छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानासाठी वंदनीय आणि प्रेरणास्थान आहेत. मात्र त्यांच्या पुतळ्यांच्या आडून काही समाजकंठक आणि राजकीय स्वार्थी घटक आपले...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!