spot_img
spot_img

मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर संकट ;१५ मेपासून १० टक्के पाणीकपात

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने महापालिकेने १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जलाशयांमध्ये केवळ २३.५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, वाढते तापमान आणि बाष्पीभवनामुळे जलाशयांतील पाणीसाठ्यात वेगाने घट होत आहे. अतिरिक्त राखीव साठ्यातून काही प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून पाणीकपात लागू करण्यात येत आहे.
समाधानकारक पाऊस पडून जलाशयांतील पाण्याची पातळी वाढेपर्यंत ही कपात कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Related Articles

मोदींवर टीका करणाऱ्यांनी सोनं वाटावं अन् पेट्रोल मोफत द्यावं!”

⬤ झुंजार सेनापती l मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन जपून वापरण्याचे आणि काही काळ सोन्याच्या खरेदीत संयम ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली...

देश संकटात, पण अंधारे बाईंची वाकडे तोंड करून प्रसिद्धी मिळवण्याची धडपड?

⬤ झुंजार सेनापती l मुंबई देशासमोर निर्माण होणाऱ्या संभाव्य आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय संकटांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन जपून वापरण्याचे तसेच काही काळ...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!