spot_img
spot_img

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

झुंजार सेनापती l मुंबई, दि. १४ : विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित १० सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई तसेच आमदार रविंद्र चव्हाण उपस्थित होते.
आज डॉ. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे, डॉ. प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनिल कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.
शपथविधीनंतर सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

विठुरायाच्या दर्शनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी 'पंढरपूर कॉरिडॉर' प्रकल्पाची...

विठुरायाच्या दर्शनासाठी आधुनिक सुविधा; पंढरपूर कॉरिडॉर उभारणार

⬤ झुंजार सेनापती l पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!