spot_img
spot_img

नेकनूर पोलीस ठाण्यात लाचखोर पोलीस जेरबंद; नागरिकांचा फटाके फोडून जल्लोष

झुंजार सेनापती l बीड 

बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस हवालदार दत्तात्रय बळवंत (वय ४१) आणि त्याच्या वतीने लाचेची रक्कम स्वीकारणारा होमगार्ड रशीद दगडूखा पठाण (वय ५२, रा. नेकनूर) यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. शनिवारी दुपारी नेकनूर पोलीस ठाण्याच्या आवारातच ही धडक कारवाई करण्यात आली.

लाचखोरीच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. पोलीस ठाण्याच्या आवारातच एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना बेड्या ठोकण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, या कारवाईची माहिती नेकनूर शहरात व परिसरात वाऱ्यासारखी पसरताच अनेक शेतकरी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला. काही ठिकाणी फटाके फोडून या कारवाईचे स्वागत करण्यात आले. “लाचखोरीविरोधातील ही कारवाई सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या.

दरम्यान, या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास करत आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!