spot_img
spot_img

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान

⬤ झुंजार सेनापती l मुंबई : पर्यावरण वाचवणे आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूगर्भात मुरवणे आणि वाहून जाणारी माती थांबवणे ही गरज ओळखून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.

मृद व जलसंधारण विभाग गेल्या काही वर्षांपासून राज्यभर भरीव काम करीत आहे. सध्या आम्ही ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मंत्री श्री.राठोड यांनी दिली.

मंत्री श्री.राठोड म्हणाले की,  राज्यातील तलावांमध्ये, बंधारे व धरणांमध्ये गेल्या काही वर्षांपासून भरपूर गाळ साचला आहे. हा गाळ म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोनं आहे. ते नैसर्गिक कंपोस्ट खत आहे. जर आपण धरणातील हा गाळ काढून शेतात टाकला, तर दोन फायदे होतात. धरणातील गाळ निघाल्यामुळे धरणात अधिक पाणी साठा निर्माण होईल आणि तो अधिक दिवस टिकेल. तर हा गाळ शेतात टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन वाढेल आणि शेतकरी सुखी होईल.

छोटे-छोटे बंधारे बांधणे, नाल्यांचे खोलीकरण-रुंदीकरण करणे, पावसाचे पाणी अडवणे ही कामे आज राज्यभर सुरू आहेत. पण हे काम फक्त शासनाचे नाही, या कामात समाजाचेही योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावाने, प्रत्येक शेतकऱ्याने या मोहिमेत सहभाग घ्यावा. आपण जर आज पाणी अडवले, माती अडवली, तर उद्याची पिढी आपल्याला धन्यवाद देईल. पर्यावरण वाचवायचे असेल, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणायचा असेल, तर जलसंधारणाशिवाय पर्याय नाही, असे ही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

Related Articles

วิธีการเข้าใช้ ku casino thailand ที่ง่ายและสะดวกที่สุด

ในบทความนี้เราจะสำรวจวิธีการเข้าใช้ ku casino thailand ที่ง่ายและสะดวกที่สุด พร้อมทั้งแบ่งปันประสบการณ์ของผู้เล่นที่ได้ใช้บริการจริง เราจะพูดถึงการเข้าถึง ku casino ผ่าน ku casino login และวิธีการใช้ app ku casino เพื่อเพิ่มความสะดวกในการเล่นเกมต่างๆ ที่ ku casino - kubet นอกจากนี้ยังมีข้อมูลเกี่ยวกับข้อเสนอพิเศษและโปรโมชั่นที่น่าสนใจอีกมากมาย...

Tutto quello che devi sapere sul bonus Newgioco per i nuovi giocatori

In questo articolo, esploreremo nel dettaglio il bonus newgioco offerto ai nuovi giocatori. Discuteremo delle diverse tipologie di bonus disponibili, dei requisiti di scommessa,...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!