भारत आणि न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना वानखेडेवर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा लंच ब्रेक होईपर्यंत भारताने ५ विकेट्स गमावत या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करावी लागली.
टीम इंडियाने चांगली गोलंदाजी करत किवी संघाला २३५ धावांवर रोखले. मात्र, या खेळीदरम्यान भारताच्या फिरकीपटूंनी बरेच नो बॉल टाकले, ज्यामुळे भारताचे महान खेळाडू सुनीव गावस्कर संतापले. भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या प्रकरणावर ऑन एअर मजा फिरकी घेतली.
न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अनेक नो बॉल टाकले हे पाहून माजी भारतीय फिरकीपटू सुनील गावस्कर वैतागले होते. सुंदर वारंवार नो बॉल टाकत होता, यादरम्यान कॉमेंट्री करणाऱ्या रवी शास्त्रीने एक मजेशीर प्रसंग शेअर केला. त्यांनी सांगितले की, सुंदरने नो बॉल टाकल्यावर गावस्कर संतापले आणि लंच करताना रागाच्या भरात त्याने एक प्लेट फोडली.
शास्त्री गंमतीने म्हणाले, ‘सुनील गावस्कर जेवत होते. त्यांनी सुंदरचा नो बॉल पाहून प्लेट भिंतीवर फेकली. देवाचे आभार मानतो की ते (सुनील गावसकर) स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत नव्हते.