spot_img

आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद  

झुंजार सेनापती l मुंबई 

आपले सरकार‘ पोर्टलची सेवा नियमित व तांत्रिक देखभालीसाठी  १० ते १४ एप्रिल, २०२५ अशी पाच दिवस बंद राहील. या कालावधीत ‘आपले सरकार‘ सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागातील ‘आपले सरकार‘ केंद्र चालक, ‘सेतू‘ केंद्र चालक, संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी कृपया या पूर्वसूचनेची नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Related Articles

शेताच्या बांधावर पोहोचून मुख्यमंत्र्यांकडून पीक नुकसानीची पाहणी!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई पावसाअभावी शेतातील  कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने...

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला माणुसकीचा हात! पालकमंत्री संजय शिरसाट यांची दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसोबत दिवाळी

⬤ झुंजार सेनापती l मुंबई दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आणि दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्यासोबत आहोत, ही भावना रुजविण्यासाठी आज राज्याचे सामाजिक न्याय...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!