spot_img

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती होणार

मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून, त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मिती करण्यास मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याची दृष्य स्वरुपात जागतिक स्तरावर ओळख निर्माण व्हावी, यासाठी मराठीसह विविध भाषांमध्ये चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन जागतिक स्तरावर करण्यात येणार आहे.  तसेच चित्रपट दूरदर्शन आणि ओटीटी माध्यमावरुनही प्रदर्शित करण्यात येणार आहे.

चित्रपट निर्मितीसाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, गोरेगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठीची संस्था आणि दिग्दर्शक निवडीसाठी सात एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यानुसार या शासन निर्णयांमध्ये तरतूद करण्यात आलेली छाननी आणि निवड समिती दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मिती संस्था निवडक करेल.

चित्रपटाच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपटांना अनुदान, सहाय्यक अनुदाने यामधील अर्थसंकल्पीय तरतुदी करण्यासही मान्यता देण्यात आली.

Related Articles

झाडांची कत्तल, पोलिसांचे मौन! पवनचक्की कंपनीला अभय कोणाचे?

⬤ झुंजार सेनापती l नेकनूर विकासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल सुरू असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडूनच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नेकनूर परिसरातील नागरिकांनी...

पशुधनासाठी चारा लागवडीला शासनाचे प्रोत्साहन; सात नवीन चारा पिकांचा योजनेत समावेश!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत वैयक्तिक तसेच...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!