spot_img
spot_img

विभागीय लोकशाही दिनाचे ९ फेब्रुवारी रोजी आयोजन

झुंजार सेनापती l छत्रपती संभाजीनगर 

 विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ९ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. 

तक्रार करण्यासाठीचे अर्ज विहित मुदतीत नमुना प्रप्रत्र-1 (क) मध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखा प्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत.

अर्जाच्या दोन प्रती विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे समक्ष पुन्हा सादर कराव्यात. तसेच ज्यांनी यापुर्वीच्या विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेले असतील परंतू त्यांचे प्रकरणात अद्याप कार्यवाही झाली नाही, अशा प्रकरणात त्यांना पुन्हा अर्ज देता येणार नाही.

 जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या प्रश्नांची सोडवणूक होवू शकली नाही किंवा या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये तक्रारदाराचे समाधान झाले नाही, असे सर्व प्रश्न विभागीय स्तरावरील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार आहेत, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Kako tiki taka casino promo code môže zmeniť váš herný zážitok

V tomto článku sa pozrieme na to, ako môže tiki-takacasino.sk promo kód zmeniť váš herný zážitok. Zameriame sa na výhody, ktoré ponúka, ako ho...

Εξερευνήστε τις εξαιρετικές υπηρεσίες πελατών στο Wishwin Casino για καλύτερη εμπειρία

Στο άρθρο αυτό, θα εξερευνήσουμε τις εξαιρετικές υπηρεσίες πελατών που προσφέρει το μάρκα Wishwin Casino. Θα αναλύσουμε τις διάφορες δυνατότητες υποστήριξης, την προσβασιμότητα και...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!