spot_img
spot_img

महाराष्ट्र एमएसएमई परिषद व पुरस्कारासाठी नोंदणीचे आवाहन

झुंजार सेनापती l मुंबई
मुंबई, दि. २२ जून : महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्या वतीने जागतिक एमएसएमई दिनानिमित्त २७ जून २०२६ रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात ‘महाराष्ट्र एमएसएमई परिषद व एमएसएमई पुरस्कार २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणाऱ्या या परिषदेसाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘संकल्पातून सिद्धीकडे – वचनबद्धतेपासून यशाकडे’ ही यंदाच्या परिषदेची संकल्पना असून राज्यभरातील सुमारे २,५०० हून अधिक एमएसएमई उद्योजक, वित्तीय संस्था, उद्योगतज्ज्ञ, गुंतवणूकदार तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.
निर्यातवृद्धी, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल परिवर्तन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, शाश्वत औद्योगिक विकास आणि उद्योग क्षेत्रातील नव्या संधी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. उद्योजकांना उद्योगवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन, तज्ज्ञांचे सल्ले तसेच विविध क्षेत्रांतील यशस्वी अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
परिषदेदरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एमएसएमई उद्योजकांचा ‘एमएसएमई पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात येणार असून, उद्योग क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे. राज्यातील अधिकाधिक उद्योजकांनी या परिषदेत सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाने केले आहे.

Related Articles

मांजरसुंबा घाटात कुटुंबाला ओलीस ठेवून दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद

झुंजार सेनापती | मुंबई बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट परिसरात कुटुंबासह प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अडवून कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकणे, अपहरण करून विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या डांबून...

महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेला सुरवात

झुंजार सेनापती | मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा करत राज्यात समान नागरी कायद्याचा (UCC) मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!