spot_img

मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना’प्रभावीपणे राबवा

- रोहयो मंत्री भरत गोगावले

झुंजार सेनापती l मुंबई 

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना‘ अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले  यांनी दिले.

मंत्रालयात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या दालनात आयोजित मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप अडसड, नाना पटोले, विनोद अग्रवाल, अभिमन्यू पवार, राजू तोडसाम,  राजेंद्र पाटील आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. गोगावले म्हणाले, योजनेतील कामे वेळेत व दर्जेदार व्हावीत, केंद्र शासनाकडून प्रलंबित निधीसाठी पाठपुरावा करण्यात यावा, तसेच रोहयो अंतर्गत न होणारे रस्त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी योग्य रस्ता सुविधा मिळण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. कामांची गुणवत्ता राखत ती वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी विशेष लक्ष द्यावे.

राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले, ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी कामांसाठी पर्यायी समायोजन करावे. मजूर उपलब्ध नसणे ही अंमलबजावणीतील मोठी अडचण असून, त्यावर तातडीने उपाययोजना करावी. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

Related Articles

झाडांची कत्तल, पोलिसांचे मौन! पवनचक्की कंपनीला अभय कोणाचे?

⬤ झुंजार सेनापती l नेकनूर विकासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल सुरू असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडूनच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नेकनूर परिसरातील नागरिकांनी...

पशुधनासाठी चारा लागवडीला शासनाचे प्रोत्साहन; सात नवीन चारा पिकांचा योजनेत समावेश!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत वैयक्तिक तसेच...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!