spot_img
spot_img

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’चा बिग बँग!

खर्चमुक्त, अभिनव उपक्रमाचा राज्यभर शुभारंभ

झुंजार सेनापती l मुंबई
महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग व परिवहन विभागाच्या सहकार्याने ‘बीग्सी’ (BYGSY) हा अभिनव आणि पूर्णतः खर्चमुक्त उपक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली. सामाजिक जाणिवेतून सुरू झालेला हा उपक्रम भविष्यात महिला सुरक्षेचा नवा अध्याय लिहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र पोलीस, मोटार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि ETS 360 टेक्नोलॉजी सोल्युशन यांच्या सहकार्याने मुंबईसह राज्यातील काळी-पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षांसाठी या सेवेचा आरंभ करण्यात आला. यावेळी सह परिवहन आयुक्त शैलेश कामत, वाहतूकचे उपआयुक्त अजित बोगार्डे, मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील तसेच बीग्सीचे संस्थापक प्रा. निरंजन भट उपस्थित होते.
परिवहन आयुक्त भिमनवार म्हणाले की, शहरीकरणामुळे महिलांचा कामासाठीचा प्रवास वाढला असून त्यांच्या सुरक्षेबाबत कुटुंबीयांमध्ये कायम चिंता असते. निर्भया प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर गंभीरपणे घेतला गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवासी वाहनात व्हीएलटीडी आणि पॅनिक बटन बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर कोणताही आर्थिक भार न टाकता महिलांना सुरक्षितता देणारा पर्यायी उपाय म्हणून ‘बीग्सी’ विकसित करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत वाहनात QR कोडसह चालक व वाहन ओळख पॅनल बसविण्यात आले आहे. बीग्सी अ‍ॅपद्वारे QR कोड स्कॅन केल्यानंतर वाहनाचा मार्ग गुगल मॅपवर दिसतो. अ‍ॅपमधील SOS बटन सक्रिय केल्यास वाहन, चालक व प्रवासी यांची माहिती थेट पोलीस नियंत्रण कक्ष 112 येथे पाठवली जाते, त्यानंतर जवळची पोलीस व्हॅन ५ ते ६ मिनिटांत मदतीसाठी दाखल होते.
हा उपक्रम सध्या ऐच्छिक असला तरी त्याबाबत व्यापक जनजागृती करणे गरजेचे असल्याचे भिमनवार यांनी सांगितले. चालक व प्रवासी यांच्यात विश्वास निर्माण करणे आणि कमांड कंट्रोल सेंटर सतत सज्ज ठेवणे यावरच या योजनेचे यश अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई हे हे तंत्रज्ञान सुरू करणारे देशातील पहिले शहर, तर महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. ही योजना शासन, चालक आणि नागरिकांसाठी पूर्णतः मोफत असून खर्च कॉर्पोरेट निधी व प्रायोजकत्वातून केला जाणार आहे.

Related Articles

शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

⬤ झुंजार सेनापती l मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात...

Kā lejupielādēt un instalēt Ice Casino apk savā viedtālrunī

Šajā rakstā mēs apskatīsim, kā viegli lejupielādēt un instalēt Ice Casino apk savā viedtālrunī, lai jūs varētu izbaudīt aizraujošo kazino pieredzi, kas piedāvā dažādus...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!