spot_img
spot_img

महापौर पदासाठी आज सोडत!

मुंबईच्या आरक्षणाकडे राज्याचे लक्ष

झुंजार सेनापती l मुंबई
महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील प्रमुख शहरांचा नवा महापौर कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आदी महापालिकांसाठी महापौर पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आज गुरुवारी (दि. २२) सोडत काढली जाणार आहे.
ही सोडत ओबीसी, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), महिला किंवा सर्वसाधारण गटासाठी निघणार का, यावर राजकीय समीकरणे अवलंबून असल्याने सर्वच पक्षांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि धाकधूक निर्माण झाली आहे. आरक्षण जाहीर होताच संभाव्य महापौरांची नावे पुढे येणार असून, पक्षांतर्गत हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
सोडतीच्या निकालावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची रणनीती ठरणार असून, काही ठिकाणी महापौर पदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळू शकते. विशेषतः मुंबई महापालिकेच्या महापौर पदाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सोडत प्रक्रियेसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आजची सोडत शहरांच्या राजकारणाला नवे वळण देणार असल्याचे स्पष्ट आहे.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!