spot_img
spot_img

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

झुंजार सेनापती l मुंबई
भारत देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या या मंगलदिनी अवघा देश तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाला असून, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी तिरंगा डौलाने फडकताना दिसत आहे.
राजधानी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य संचलनातून देशाचे लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकतेचे प्रभावी दर्शन घडणार आहे. या संचलनात विविध राज्यांच्या झांक्या, सशस्त्र दलांचे पथक आणि विशेष कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा मुंबईतील शिवाजी पार्क, दादर येथे संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ९.१५ वाजता ध्वजवंदन करण्यात येणार आहे.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य समारंभास उपस्थित राहणार आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी ध्वजवंदन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Tutto quello che devi sapere sul bonus Newgioco per i nuovi giocatori

In questo articolo, esploreremo nel dettaglio il bonus newgioco offerto ai nuovi giocatori. Discuteremo delle diverse tipologie di bonus disponibili, dei requisiti di scommessa,...

Kā x3000 lv piedāvājumi var uzlabot jūsu azartspēļu pieredzi

Šajā rakstā mēs aplūkosim, kā x3000 lv piedāvājumi var būtiski uzlabot jūsu azartspēļu pieredzi. Mēs izpētīsim dažādas bonusu iespējas, bezriska griezienus, un citas priekšrocības,...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!