spot_img

कडक पोलीस बंदोबस्तात कोल्हेंचे व्याख्यान

" विरोधाला चेहरा नसतो"

झुंजार सेनापती  l पुणे 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांचे व्याख्यान कडक पोलीस बंदोबस्तात पार पडले. व्याख्यानाच्या आधी काही विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवत कुलगुरूंना निवेदन सादर केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यामुळे परिचित असलेल्या कोल्हे यांच्या उपस्थितीला काही विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला होता. शिवजयंती हा सर्व समाजाचा उत्सव असून त्याचे राजकीयकरण होऊ नये, अशी भूमिका विरोधकांनी मांडली होती. मात्र विद्यापीठ प्रशासनाने कार्यक्रम नियोजित वेळेनुसार घेण्याचा निर्णय कायम ठेवला.
सायंकाळी ४ वाजता व्याख्यानास सुरुवात झाली. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते. प्रवेशद्वारांवर तपासणी करूनच विद्यार्थ्यांना आत सोडण्यात येत होते. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
व्याख्यानापूर्वी अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना, “विरोधाला चेहरा नसतो. विचार मांडण्याची भीती वाटली की असा विरोध उभा राहतो,” असे मत व्यक्त केले. “विद्यापीठाने निमंत्रण दिले आहे. विरोध करणाऱ्यांनी व्याख्यान ऐकून प्रश्न विचारावेत,” असेही ते म्हणाले.
वादाच्या पार्श्वभूमीवरही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे चित्र दिसून आले. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांचे सत्रही पार पडले.

Related Articles

पशुधनासाठी चारा लागवडीला शासनाचे प्रोत्साहन; सात नवीन चारा पिकांचा योजनेत समावेश!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत वैयक्तिक तसेच...

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आधार व स्वयंम योजनांचे नूतनीकरण सुरू!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबई शहर, उपनगर जिल्ह्यातील ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ आणि ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ यांचा लाभ घेणाऱ्या विद्यमान विद्यार्थ्यांनी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!