spot_img
spot_img

विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेची कडक कारवाई! टीसी प्रवीण मेंथे यांची कोट्यवधींची दंडवसुली

झुंजार सेनापती l मुंबई
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक प्रवीण मेंथे यांनी सीएसएमटी ते इगतपुरी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई करत तब्बल १ कोटी ६ हजार २३० रुपयांची दंडवसुली केली आहे. या कामगिरीमुळे मेंथे यांचे नाव रेल्वेतील ‘कोट्यधीश तिकीट तपासनीस’ यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.
मध्य रेल्वेवर वाढत्या विनातिकीट प्रवासामुळे महसूल कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष तिकीट तपासणी पथके तयार करून मोहीम हाती घेतली आहे. या पथकांद्वारे दररोज लाखो रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.
मुंबई विभागात चालू आर्थिक वर्षात मोहम्मद शम्स चंद यांनी ११,४८३ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून १ कोटी ३८ हजार ५०५ रुपये दंड वसूल केला होता. त्यानंतर प्रवीण मेंथे यांनी ११,५५९ प्रवाशांकडून दंड वसूल करत कोटींचा टप्पा पार केला आहे.
मेंथे हे १९९३ साली कनिष्ठ तिकीट तपासनीस म्हणून भारतीय रेल्वेत रुजू झाले. रे रोड, कल्याण आणि शहाड या स्थानकांवर त्यांनी सेवा बजावली असून गेल्या दहा वर्षांपासून ते मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधील प्रवाशांची तिकीट तपासणी करत आहेत.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!