spot_img
spot_img

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही

         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

झुंजार सेनापती l मुंबई

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सखोल तपास केला आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी सात गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) आहे. उर्वरित एक गुन्हा नाशिक शहर गुन्हे शाखेकडे आहे.  भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  अशोक खरात प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासाप्रकरणी विधानसभेत सविस्तर निवेदन केले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) पुढील तपास सुरू असून आरोपीच्या मोबाईलमधील डिलीट डेटा पुनर्प्राप्त करून तपास वाढविण्यात येणार आहे. या प्रकरणात इतर कोणी सहकारी किंवा अधिकारी सहभागी आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे. हा अंतरिम अहवाल असून तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. आरोपीला मदत करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकरणाची सुरुवात 29 डिसेंबर 2025 रोजी नाशिक जिल्ह्यातील वावी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या तक्रारीपासून झाली. फिर्यादीकडून व्हॉटसअपवर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप होता. मात्र, प्राथमिक तपासात या तक्रारीत ठोस पुरावा आढळला नाही. यानंतर शिर्डी येथे एका महिलेने निरज जाधव या व्यक्तीने व्हॉटसअपवर एआय-आधारित अश्लील फोटो पाठवून धमकी दिल्याची तक्रार केली. या प्रकरणातही सुरुवातीला ठोस पुरावा मिळाला नाही. मात्र तपासादरम्यान भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित योगेश भालेराव हा महत्त्वाचा साक्षीदार पुढे आला. त्याने पोलिसांना दिलेल्या  व्हिडिओंमध्ये आठ महिलांचे 35 व्हिडिओ असल्याचे समोर आले. या व्हिडिओमध्ये असलेल्या अशोक खरात याने महिलांना भोंदूगिरी, जादूटोणा व धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांना लज्जा वाटेल असे अश्लील चाळे केले असल्याचे दिसून आले. या गंभीर बाबी लक्षात घेऊन वावी व शिर्डी येथील गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली. दरम्यान, आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले.एसआयटीकडे वरील प्रकरणी तिन्ही गुन्हे एकत्रित तपासासाठी आल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी, आरोपीची वैद्यकीय तपासणी, आरोपीसोबत काम करणाऱ्या साक्षीदारांकडे विचारपूस करण्यात आली. आरोपीचा कार चालक, त्याच्यासोबत काम करणारे नोकर, मिरगाव फार्म हाऊसवरील त्याच्याकडे काम करणारे लोक, त्याच्या सोबतचे पुजारी यांचा जवाब नोंदवण्यात आला. ज्या साक्षीदाराकडून शिर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात व्हिडिओ जप्त केले तो साक्षीदार देखील तणावात होता, त्याला पोलीस संरक्षण पुरवून सुरक्षेची पूर्ण हमी देऊन त्याच्याशी चर्चा करून व्हिडिओच्या पुराव्याची कडी जोडण्यात आली आहे. ज्या साक्षीदारांनी पोलिसांना व्हिडिओ हजर केले आहेत, ते साक्षीदार तसेच त्यांनी ज्यांच्याकडून व्हिडिओ मिळवले ते महत्वाचे साक्षीदार यांचे जवाब नोंद करण्यात आले आहेत. पीडित महिलेचे नातेवाईकांचे जवाब नोंद करण्यात आले आहेत. आरोपीच्या सीडीआरसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नाशिक शहरात सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे आणखी एका महिलेने तक्रार दाखल केली. भोंदू बाबा अशोक खरात याने दैवी शक्ती असल्याचे भासवून, मंत्र-तंत्राच्या नावाखाली गुंगीकारक पदार्थ देत वारंवार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला. या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ अशोक खरात याला अटक केली. तपासात आरोपीच्या कार्यालय, घर आणि फार्महाऊसवर छापे टाकून रोख रक्कम, लॅपटॉप, शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. मोबाईल डेटा फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे. सायबर तपासाद्वारे आरोपीच्या मोबाईलमधील डेटा तपासला जात असून डिलीट केलेली माहिती पुनर्प्राप्त करण्याचे काम सुरू आहे.

या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांकडून पीडित महिलांचे समुपदेशन केले जात आहे. सुरुवातीला भीतीमुळे कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. मात्र पोलिसांनी विश्वास दिल्यानंतर काही महिलांनी तक्रारी नोंदवल्या. आतापर्यंत 6 पीडित महिलांची ओळख पटली असून त्यांच्या तक्रारींवरून स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही व्हिडिओमध्ये असलेल्या व व्हिडिओत नसलेल्या पीडित महिलांचा शोध सुरू असून त्यांचे समुपदेशन करून तक्रार दाखल करण्यासाठी तयार करण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पीडित महिलांची ओळख उघड होऊ नये म्हणून फेसबुक, इंन्स्टाग्राम, यूट्यूब आदी सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो, व्हिडिओ हटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. फेसबुकवरील व्हिडिओ हटविण्याची कारवाई सुरू झाली आहे. तसेच पीडितांची ओळख उघड होईल असे वृत्तांकन करणाऱ्या न्यूज चॅनेलच्या संपादकांनाही नोटिसा देण्यात आल्या असून पीडितांची ओळख असलेले वृत्तांकन तत्काळ बंद करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात आरोपीकडे सुमारे ४० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. विविध ठिकाणी जमीन, फ्लॅट, बंगले, तसेच परदेश प्रवासाचे तपशीलही समोर आले आहेत. आर्थिक व्यवहार, करचुकवेगिरी आणि इतर गैरव्यवहारांचाही तपास सुरू आहे.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाच्या तपासासाठी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. आतापर्यंतचा तपासाचा हा अंतरिम अहवाल असून तपास अजून सुरू आहे. आरोपीच्या कस्टडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. पुढील काळात अधिक माहिती समोर येईल. सभागृहाला वेळोवेळी माहिती दिली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Tutto quello che devi sapere sul bonus Newgioco per i nuovi giocatori

In questo articolo, esploreremo nel dettaglio il bonus newgioco offerto ai nuovi giocatori. Discuteremo delle diverse tipologie di bonus disponibili, dei requisiti di scommessa,...

Kā x3000 lv piedāvājumi var uzlabot jūsu azartspēļu pieredzi

Šajā rakstā mēs aplūkosim, kā x3000 lv piedāvājumi var būtiski uzlabot jūsu azartspēļu pieredzi. Mēs izpētīsim dažādas bonusu iespējas, bezriska griezienus, un citas priekšrocības,...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!