spot_img
spot_img

मुदत संपलेले व बंद हायड्रोप्रोजेक्ट पुन्हा कार्यान्वित होणार

सीना नदी पुनर्जीवन कामाला गती; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

⬤ झुंजार सेनापती l प्रतिनिधी 

मुंबई, दि. २३ : कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील मुदत संपलेले व बंद पडलेले हायड्रोप्रोजेक्ट पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री (कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत धुमाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा विभागामार्फत जलविद्युत प्रकल्पांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसंदर्भात धोरण निश्चित करण्यात आले असून, १९६३ ते २००२ या कालावधीत कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांचे आयुर्मान २४ ते ६३ वर्षांदरम्यान असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

महामंडळाच्या कार्यक्षेत्रात एकूण १६ जलविद्युत प्रकल्प असून त्यांची स्थापित क्षमता २०७१ मेगावॅट इतकी आहे. मुदत संपलेले व बंद असलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी महामंडळ स्तरावर आवश्यक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जलविद्युत प्रकल्पांचे सर्वसाधारण आयुर्मान ३५ वर्षे गृहित धरले जाते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

सीना नदी पुनर्जीवन कामाला गती

अहिल्यानगर शहरातील सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम महानगरपालिकेमार्फत सुरू असून या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.

जलसंपदा विभाग आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या समन्वयातून काटवन खंडोबा परिसरासह शहर हद्दीतील सीना नदीचे पुनर्जीवन करण्यात येत आहे. नदीच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूंना कामे हाती घेण्यात येणार आहेत.

या कामाची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच ८ जून रोजी प्रत्यक्ष पाहणी केली होती. नियामक मंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!