spot_img
spot_img

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन  

झुंजार सेनापती l मुंबई, दि. ४ : राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असणाऱ्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रति महिना रू. 5000/- (अक्षरी पाच हजार रुपये फक्त) मानधन देण्यात येते. यासाठी पात्र लाभार्थीना 1 ते 31 जुलैपर्यंत ऑनलाईन आपले सरकार पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहरच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.

या योजनेसाठी लाभार्थींची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. लाभार्थीचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असावे. दिव्यांगाना वयाची अट 10 वर्षाने शिथिल करण्यात आली आहे. त्यांची वयोमर्यादा 40 वर्षे आहे. कला व साहित्य क्षेत्रात योगदान कमीत कमी 15 वर्षे असावे. वयाने ज्येष्ठ असणारे विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग कलाकारांना प्राधान्य राहील. कलाकारांचे वार्षिक उत्पन्न 60 हजारापेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजिवीका फक्त कलेवरच अवलंबून आहे. त्यांना कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार पात्र राहतील. ते केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळ व कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्गत नसावे. कलाकार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी मुदतीत आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा. असे आवाहन, निवासी उपजिल्हाधिकारी, मुंबई शहर डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी केले आहे.

अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पति-पत्नी एकत्रित फोटो (लागू असल्यास), बँक पासबूक, अपंगत्व दाखला (लागू असल्यास) राज्य व केंद्र सरकारचे प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था, व्यक्ती यांचे शिफारसपत्र (लागू असल्यास) यासह विविध पुरावे, आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Related Articles

अमृत’च्या माध्यमातून ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायाला चालना

झुंजार सेनापती l मुंबई, दि. १ : हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),...

Kako tiki taka casino promo code môže zmeniť váš herný zážitok

V tomto článku sa pozrieme na to, ako môže tiki-takacasino.sk promo kód zmeniť váš herný zážitok. Zameriame sa na výhody, ktoré ponúka, ako ho...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!