spot_img
spot_img

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी १ ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्राची सक्ती

झुंजार सेनापती l मुंबई 

राज्यात वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार असून त्यानुसार महाराष्ट्र अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य दिलीप लांडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सरनाईक बोलत होते. या चर्चेत सदस्य सुनील प्रभू यांच्या सह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, ड्रायव्हिंग परवाना नवीन नियमावलीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. या क्षेत्राचे नियमन करून राज्याला महसूल मिळावा आणि तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासन नियोजन करत आहे.

या नव्या व्यवस्थेनुसार बाईक टॅक्सी चालकांकडून दररोज पाच रुपये महसूल जमा करण्यात येणार आहे. प्रत्येक राईडमागे दोन रुपये कल्याण निधीसाठी जमा करणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे; तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे किंवा चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांवर परिवहन विभागाकडून कठोर दंडात्मक कारवाई केल

Related Articles

Jak rozpocząć przygodę z 1win poland i jakie są dostępne opcje gier

W dzisiejszym artykule przyjrzymy się, jak rozpocząć swoją przygodę z 1win casino w Polsce. Omówimy proces rejestracji, dostępne opcje gier oraz różne bonusy, które...

วิธีการเข้าใช้ ku casino thailand ที่ง่ายและสะดวกที่สุด

ในบทความนี้เราจะสำรวจวิธีการเข้าใช้ ku casino thailand ที่ง่ายและสะดวกที่สุด พร้อมทั้งแบ่งปันประสบการณ์ของผู้เล่นที่ได้ใช้บริการจริง เราจะพูดถึงการเข้าถึง ku casino ผ่าน ku casino login และวิธีการใช้ app ku casino เพื่อเพิ่มความสะดวกในการเล่นเกมต่างๆ ที่ ku casino - kubet นอกจากนี้ยังมีข้อมูลเกี่ยวกับข้อเสนอพิเศษและโปรโมชั่นที่น่าสนใจอีกมากมาย...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!