spot_img
spot_img

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. येत्या २५ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांची असून,   मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात शुक्रवार दिनांक २५ एप्रिल, २०२५ रोजी पहिल्या पुष्पात सायंकाळी ६.०० वाजता विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर आहे. तर याच दिवशी उस्ताद शाहिद परवेझ यांचाही शास्त्रीय गायनाचा कार्यकम होणार आहे. शनिवार दिनांक २६ एप्रिल, २०२५ रोजी दुसऱ्या पुष्पात सायंकाळी ६.०० वाजता डॉ. भरत बलवल्ली तसेच विदुषी मंजुषा पाटील यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यकम होईल. रविवार दिनांक २७ एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ज्येष्ठ गायक पं. आनंद भाटे आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

उपरोक्त शास्त्रीय संगीत महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामुल्य ठेवण्यात आलेला आहे. विनामुल्य प्रवेशिका रवींद्र नाट्य मंदिर-प्रभादेवी, छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर आणि यशवंत नाट्य मंदिर-माटुंगा येथे उपलब्ध आहेत.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!