spot_img
spot_img

बीडमध्ये हेल्मेट सक्तीचा दणका! पहिल्याच दिवशी १८० जणांवर कारवाई

१ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसुल

झुंजार सेनापती l प्रतिनिधी । बीड
नवीन मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकी वाहन चालकांसह मागे बसणाऱ्या प्रवाशालाही हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही हेल्मेट सक्ती सोमवार (दि. १९) पासून लागू करण्यात आली आहे.
या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी नगरपालिका तसेच इतर शासकीय कार्यालयांत येणाऱ्या तब्बल १८० जणांनी हेल्मेट नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यामुळे वाहतूक शाखेमार्फत संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी दिली.
बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून विविध कठोर निर्णय राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, यापूर्वी काही प्रमाणात शिथिल असलेली हेल्मेट सक्ती आता पुन्हा प्रभावीपणे लागू करण्यात आली आहे. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक दुचाकी चालक व मागे बसणाऱ्या प्रवाशाने हेल्मेट वापरणे अनिवार्य असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!