spot_img
spot_img

खंबीर नेता हरपला..

- उद्धव ठाकरे

झुंजार सेनापती l मुंबई
“एक खंबीर नेता आणि माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी मी गमावला आहे,” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री होते. ते अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक ठेवणारे आणि अर्थ विभागाचा सखोल अभ्यास असलेले नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांच्याशी माझे विशेष नाते जुळले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अजित पवार हे दिलखुलास स्वभावाचे होते. मनात येईल ते स्पष्टपणे बोलणारे, मात्र दीर्घद्वेष न ठेवणारे नेते होते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला तरी संबंध तुटू दिले नाहीत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते कार्यकर्त्यांना जपणारे नेते होते. प्रसंगी कठोर वाटले तरी अडचणीच्या वेळी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे ‘दादा’ म्हणून ते ओळखले जात होते. अनेकांना त्यांनी पक्षात संधी दिली.
“महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील, असे वाटले नव्हते. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे तसेच ठाकरे आणि शिवसेना परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Articles

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी !

झुंजार सेनापती l मुंबई भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे....

Jakie korzyści oferuje robocat bonus dla stałych klientów kasyna

W artykule omówimy, jakie korzyści płyną z robocat bonusu, skierowanego do stałych klientów kasyna. Zbadamy, jak ten bonus może wpłynąć na doświadczenie graczy, jakie...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!