spot_img
spot_img

एका कर्तृत्ववान नेत्याला महाराष्ट्र मुकला

शरद पवार यांना अश्रू अनावर

झुंजार सेनापती l बारामती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अश्रू अनावर झाले. माध्यमांसमोर बोलताना ते अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. महाराष्ट्रासाठी हा प्रचंड धक्का आहे. एका कर्तृत्ववान आणि जमिनीशी घट्ट नाळ असलेल्या नेत्याला आज महाराष्ट्र मुकला आहे. झालेले नुकसान कधीही भरून निघणारे नाही,” असे शरद पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मी आज मीडियासमोर येणार नव्हतो. मात्र काही जणांनी या अपघातामागे राजकारण असल्याची भूमिका घेतली आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की यात कोणतेही राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. या दुर्घटनेच्या वेदना महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना होत आहेत. कृपया या घटनेला राजकारणाशी जोडू नका,” असे आवाहन शरद पवार यांनी केले.

Related Articles

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत प्रत्येक बालकाला दोन थेंब देण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

झुंजार सेनापती l मुंबई l दत्तात्रय कोकरे राज्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी रविवार 28 जून, 2026 रोजी...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी !

झुंजार सेनापती l मुंबई भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!