spot_img
spot_img

नात्याला काळिमा! सावत्र आई मुलासोबत पळाली

झुंजार सेनापती l प्रतिनिधी l बीड 
केज  तालुक्यातील एका गावात नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र आई आणि मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडून घरातून फरार झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीला दोन मुले आणि दोन मुली असून मुलींची लग्ने झाली आहेत. पती-पत्नीतील वादामुळे पहिली पत्नी मागील १५ वर्षांपासून वेगळी राहत होती. दोन्ही मुले वडिलांसोबत राहून शेती करत होती.
चार वर्षांपूर्वी त्या इसमाने एका परित्यक्ता महिलेसोबत दुसरे लग्न केले. त्यानंतर ही महिला आणि पतीची मुले एकत्र राहत होती. मात्र १२ एप्रिल रोजी पती मुंबई येथे देवदर्शनासाठी गेल्यानंतर, १५ एप्रिल रोजी सावत्र आई आणि मुलगा एकत्र फरार झाल्याची घटना उघडकीस आली.
या प्रकरणी पतीने केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर पुढील तपास करत आहेत.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!