spot_img

माहिती दडवणाऱ्या सोसायटीला सहकार विभागाचा दणका ; उपनिबंधकांकडून थेट प्राधिकृत अधिकारी नियुक्त!

झुंजार सेनापती l मुंबई  सभासदाला सोसायटीच्या कामकाजाची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विरारमधील एका गृहनिर्माण संस्थेला सहकार विभागाने चांगलाच दणका दिला आहे. मनवेलपाडा येथील ‘गोविंद अपार्टमेंट ए व बी विंग सहकारी गृहनिर्माण संस्था’मध्ये माहिती उपलब्ध करून देण्यासाठी उपनिबंधकांनी प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
काय आहे प्रकरण?
या संस्थेचे सभासद नितीन राणे यांनी जून २०२५ मध्ये संस्थेकडे लेखापरीक्षण अहवाल, बँक तपशील, सभेचे ठराव, निवडणूक माहिती तसेच खर्चाचा सविस्तर तपशील मागितला होता. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही आणि उपनिबंधक कार्यालयाने आदेश देऊनही संस्थेकडून माहिती देण्यात आली नव्हती.
सहकार विभागाची कारवाई :
संस्थेने सहकार्य न केल्याचे लक्षात आल्यानंतर वसईचे उपनिबंधक अमर शिंदे यांनी संबंधित कायद्यानुसार आदेश काढले. त्यानुसार अनिल गायकवाड यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती
अधिकारी स्वतः संस्थेकडून माहिती घेऊन सभासदाला देणार
या प्रक्रियेचा संपूर्ण खर्च संस्थेलाच करावा लागणार
अधिकाऱ्यांना १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
सरकारी आदेशाचे पालन न केल्यामुळे प्रशासनाला ही कठोर भूमिका घ्यावी लागली. या कारवाईमुळे माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या इतर संस्थांसाठी हा स्पष्ट इशारा मानला जात आहे.

Related Articles

शेताच्या बांधावर पोहोचून मुख्यमंत्र्यांकडून पीक नुकसानीची पाहणी!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई पावसाअभावी शेतातील  कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने...

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला माणुसकीचा हात! पालकमंत्री संजय शिरसाट यांची दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसोबत दिवाळी

⬤ झुंजार सेनापती l मुंबई दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आणि दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्यासोबत आहोत, ही भावना रुजविण्यासाठी आज राज्याचे सामाजिक न्याय...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!