spot_img
spot_img

नेकनूरमध्ये किरकोळ कारणावरून हिंसक वाद; पोलीसठाण्या समोर दोन गटात तुफान दगडफेक

आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय

झुंजार सेनापती l प्रतिनिधी 

बीड तालुक्यातील नेकनूर येथे रिक्षाचा कट लागण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गट आमनेसामने येत मोठा वाद निर्माण झाला. शनिवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी रिक्षा चालकाला अडवून मारहाण केली. रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या महिला व लहान मुलींनाही धक्काबुक्की करण्यात आल्याने वातावरण अधिकच तापले.

या घटनेनंतर संतप्त जमाव थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आल्याने परिस्थिती चिघळली आणि एकमेकांवर दगडफेक सुरू झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मोठी धावपळ उडाली. नेकनूर पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलत रात्री दहा वाजल्यापासून गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. बीड येथील दंगल नियंत्रण पथक तसेच केज येथील सहाय्यक पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला व नागरिकांना शांततेचे आवाहन केले.
दरम्यान, श्री गुरु बंकट स्वामी महाराजांच्या ८२व्या पुण्यतिथी निमित्त कीर्तनासाठी रिक्षातून महिला येत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी होणारा नेकनूरचा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!