spot_img
spot_img

नेकनूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांच्या गस्तीवर नागरिकांचा सवाल!

⬤ झुंजार सेनापती l बीड (वार्ताहर) :नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांची मालिका सुरूच असून, चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नेकनूरसह नांदूरफाटा, मांजरसुंबा, लिंबागणेश परिसरात घरफोड्या व चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

मागील आठवड्यात लिंबागणेश येथे घर फोडून सुमारे पंधरा लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी (दि. २) रात्री पुन्हा चोरट्यांनी नेकनूर, नांदूरफाटा आणि मांजरसुंबा परिसराला लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. एका पाठोपाठ एक चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रसिद्धीपेक्षा मैदानावरील कामगिरी महत्त्वाची!
आजच्या काळात जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा वापर आवश्यक असला तरी, नागरिकांच्या घरांचे कुलूप सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्यक्ष पोलीस गस्तीवर आहे. रील, संदेश किंवा समाजमाध्यमांवरील उपक्रमांपेक्षा रात्रीच्या वेळी रस्त्यावर पोलिसांची गाडी दिसणे, संशयितांची तपासणी होणे आणि गुन्हेगारांवर तातडीने कारवाई होणे, हीच नागरिकांची खरी अपेक्षा आहे.
नेकनूर पोलीस ठाण्याची सूत्रे प्रभारी अधिकारी मंगेश साळवे यांच्याकडे आल्यानंतर परिसरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र अलीकडील चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. वाढत्या घटनांना वेळीच आळा न बसल्यास चोरट्यांचे मनोबल आणखी वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Detailed Razed Review: What Every Player Needs to Know Before Joining

In this comprehensive Razed review, we’ll dive deep into everything you need to know before becoming a member of this online casino platform. From...

Understanding the BSB007 Casino Login Process for Australian Players

This article delves into the login process for the BSB007 Casino, specifically tailored for Australian players. We will explore the steps necessary for successful...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!