spot_img
spot_img

एका कर्तृत्ववान नेत्याला महाराष्ट्र मुकला

शरद पवार यांना अश्रू अनावर

झुंजार सेनापती l बारामती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अश्रू अनावर झाले. माध्यमांसमोर बोलताना ते अत्यंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. महाराष्ट्रासाठी हा प्रचंड धक्का आहे. एका कर्तृत्ववान आणि जमिनीशी घट्ट नाळ असलेल्या नेत्याला आज महाराष्ट्र मुकला आहे. झालेले नुकसान कधीही भरून निघणारे नाही,” असे शरद पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मी आज मीडियासमोर येणार नव्हतो. मात्र काही जणांनी या अपघातामागे राजकारण असल्याची भूमिका घेतली आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की यात कोणतेही राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. या दुर्घटनेच्या वेदना महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना होत आहेत. कृपया या घटनेला राजकारणाशी जोडू नका,” असे आवाहन शरद पवार यांनी केले.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!