spot_img
spot_img

एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; वेतनवाढीचे १०० कोटी रुपये खात्यात जमा

झुंजार सेनापती | मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रलंबित थकीत हप्ता अखेर त्यांच्या बँक खात्यात जमा झाला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक्स पोस्टद्वारे दिली.
सरनाईक म्हणाले की, राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घाम आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे. निधीअभावी आणि काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारी महिन्यात हप्ता देणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून २१० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली. त्यापैकी १०० कोटी रुपये तत्काळ उपलब्ध झाले असून उर्वरित निधीही लवकरच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने दरमहा सुमारे ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती.
थकीत हप्ता जमा झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून शासनाच्या बांधिलकीचा प्रत्यय आल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!