spot_img
spot_img

साडेसात लाख रुपयाची लाच घेताना सरपंच पकडला!

⬤ झुंजार सेनापती l भिवंडी 

कारिवली ग्रामपंचायतीचे सरपंच संजय नाईक यांना साडेसात लाख रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे भिवंडी परिसरात खळबळ उडाली आहे.
कारिवली ग्रामपंचायत हद्दीतील तब्बल २ कोटी ३३ लाख रुपयांच्या तलाव संवर्धन व सुशोभीकरणाच्या कामासाठी ठेकेदाराला हमीपत्र देण्याच्या बदल्यात सरपंचांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची पडताळणी करताना तडजोडीअंती साडेसात लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सरपंचांच्या खासगी कार्यालयात सापळा रचला. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताना सरपंच संजय नाईक यांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सरपंच संजय नाईक यांना अटक करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या विकासकामाशी संबंधित प्रकरणात लोकप्रतिनिधीवर झालेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

तांदळवाडी घाट येथे लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवकाचा मनमानी कारभार

झुंजार सेनापती l बीड  बीड तालुक्यातील तांदळवाडी घाट येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेली विशेष ग्रामसभा सत्ताधाऱ्यांचा सावळागोंधळ, ग्रामसेवकाची मुजोरी आणि बोगस...

Die aufregendsten Möglichkeiten, den Springbok Casino Mobile Bonus zu nutzen

In diesem Artikel erkunden wir die faszinierenden Möglichkeiten, wie Spieler den Springbok Casino Mobile Bonus optimal nutzen können. Wir werden die verschiedenen Arten von...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!